Tuesday, March 26, 2013

इस्लाम ते वैदिक धर्म

संस्कृती शोध
वसंत गद्रे
मी फक्त एका समाजाला सोडून दुसऱ्या समाजात प्रवेश केला आहे. अशिक्षित, अतार्किक, अशास्त्रीय अशा मुस्लीम उम्मांना सत्य विचारात घेण्याची आवश्यकता वाटत नाही. अंधारातून मी वैदिक धर्माने दाखवलेल्या प्रवेशात येत आहे. या धर्मात सत्याला मान आहे, शंकाकुशंकांना जागा आहे. विचारांची देवाण-घेवाण होऊ शकते. मी माझे उरलेले आयुष्य अशा समाजात घालवण्याचे निश्चित केले आहे. मौलवी महबूब अलींनी 'पंडित महेंद्रपाल आर्य' हे नाव स्वीकारले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रात उल्लेख आहे, की महाराष्ट्रात मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदूंवर प्रचंड प्रमाणात अत्याचार केले. बलात्कार, खून, लूटमार - एवढेच नव्हे, तर सक्तीने बाटवण्याचे प्रकारही केले. पुण्याजवळच्या एका विद्वान ब्राह्मणाला बाटवण्यात आले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो ब्राह्मण शेवटी मौलवी झाला व त्याने कित्येक हिंदूंना बाटवून मुसलमान धर्माची दीक्षा दिली. बंगालमध्येही असेच घडले होते, ज्याला पुढे 'काळा पहाड' म्हणून प्रसिध्दी मिळाली. त्याने एका मुस्लीम मुलीशी लग् केले, ते आपल्या समाजाला पसंत पडले नाही, म्हणून त्याला वाळीत टाकले. त्यामुळे आकसाने त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला व अनेक हिंदूना बाटवून त्यांना मुस्लीम धर्माची दीक्षा दिली व त्याचे पर्यवसान म्हणजे बांगलादेश. ही घटना आहे उत्तरप्रदेशातील वाघपत जिल्ह्यातील बदौत नावाच्या लहान गावाच्या बडी मशीदमधील मौलवी महबूब अलीची. मौलवी महबूब अली हे अतिशय सज्जन गृहस्थ. मशिदीमध्ये अल्लाची प्रार्थना करून पवित्र ग्रंथ कुराणमधील आयत आलेल्यांना समजावून सांगणे हे रोजचे काम निष्ठेने करीत. हिंदू व मुसलमान या दोन्ही धर्मातील लोकांना त्यांच्याविषयी प्रेम व आदर वाटायचा. जे लोक पहाटेच्या नमाजपठणाला येत नसत,  त्यांची हळुवारपणे कानउघडणी करत, की सकाळी पक्षी जसे लवकर उठतात त्याप्रमाणे आपण उठावे व अल्लाची प्रार्थना करावी. आपल्या हिंदू बांधवांना देखील सांगत की सकाळी लवकर उठावे व देवळात जाऊन परमेश्वराची प्रार्थना करावी. मानवजातीने वेळेचा सदुपयोग करावा. साहजिकच त्यांच्याविषयी गावातील लोकांना आपुलकी होती.
मशिदीतील लोकांना कुराण सांगायचे एवढेच त्यांचे काम असले, तरी नंतर त्यांनी इस्लामी धर्मशास्त्राची पदवी देखील प्राप्त करून घेतली. त्यामुळे त्यांच्या मनावर मुस्लीम धर्मशास्त्राची पकड पक्की होती व कुराणाखेरीज दुसरे कुठलेही नियमन नाही असा पूर्ण विश्वास होता. एक धर्म, एक अल्ला व एक कुराण म्हणजेच आयुष्य. त्याखेरीज दुसरे चांगले तत्त्वज्ञान असूच शकत नाही. अल्लाची शिकवण कुराणाप्रमाणे अमलात आणली, तर आपण सन्मार्गापासून दूर जाऊ शकत नाही व दुराचरण होऊ शकत नाही ही श्रध्दा ठाम होती.
1983 च्या हिवाळयात श्रीकृष्णपाल सिंग यांच्याशी या मौलवीची भेट झाली. श्रीकृष्णपाल सिंग हे गुरुकुल इन्द्रप्रस्थमध्ये सायन्सचे प्राध्यापक होते. गप्पा मारता मारता मौलवींनी श्री पाल ह्यांना कुराणासंबंधी व त्यातील आयतांसंबंधी माहिती सांगण्यास सुरुवात केली. हे चालू असताना श्री कृष्णपाल सिंग यांनी मौलवीसाहेबांना गुरुकुल इंद्रप्रस्थमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. दोघांची भाषा बंगाली असल्याने थोडीशी जवळीक निर्माण झाली होती, त्यामुळे कदाचित मौलवींनी ताबडतोब आमंत्रण स्वीकारले.
एका संध्याकाळी मौलवीसाहेब इंद्रप्रस्थ गुरुकुलमध्ये मुक्कामास आले. त्यांचे तेथे स्वागत करून त्यांची एका अतिशय टुमदार खोलीत व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी मघरीब नमाजपठण करावयाचे असते. त्याप्रमाणे मौलवींनी नमाजपठण केले व नंतर फिरावयास सुरुवात केली. त्याचवेळी तेथे एका प्रांगणात तेथील विद्यार्थी, शिक्षकवर्ग व आमंत्रित सज्जन यज्ञकर्मात मग् होते. त्यानंतर काहीजण तेथे संध्यावंदन करत होते, त्यानंतर प्रवचन झाले. मौलवींनी कृष्णपाल सिंग यांच्याबरोबर भोजन केले व आपल्या खोलीवर येऊन रात्रीचा नमाज करून झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णपाल सिंग यांनी तेथील काही प्रतिष्ठित व्यक्तींशी मौलवीसाहेबांचा परिचय करून दिला. त्यामध्ये प्रामुख्याने होते धरमवीर, जे गुरुकुलमध्ये प्रमुख मंत्री होते व दुसरे होते संन्यासी स्वामी शक्तिवेश. गप्पांच्या ओघात स्वामींनी मौलवींना विचारले, ''मौलवीजी, आपल्या जीवनाचे ध्येय काय?'' मौलवींनी उत्तर दिले, ''समाजाला सन्मार्गाने जगण्याकरिता शिकवण देणे, तसेच वाईट प्रवृत्तीपासून दूर कसे राहावे यासंबंधी मार्गदर्शन.'' स्वामी त्यावर म्हणाले, ''आम्हीदेखील हेच काम करतो. आर्यधर्माची हीच शिकवण आहे. आपण एकत्र येऊन हे का नाही करू शकत?'' मौलवी म्हणाले, ''तुमचे म्हणणे योग्य आहे. मला विचार करावयास वेळ द्या.''
दुसऱ्या दिवशी मौलवीसाहेबांनी पहाटे 5 वाजता उठून नमाजपठण केले व त्यानंतर फिरावयास बाहेर आले, तेव्हा त्यांना तेथील विद्यार्थी खेळ व व्यायाम करताना दिसले. तेथील शिक्षकांशी त्यांनी गप्पा मारल्या, धर्मतत्त्वांविषयी थोडीफार चर्चा झाली. त्या दिवसापर्यंत मौलवींची आध्यात्मिक विषयासंबंधी कोणाशीही चर्चा झाली नव्हती व आतापर्यंत त्यांची धारणा होती की, कुराणाखेरीज कुठेही असे तत्त्वज्ञान असू शकत नाही. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर ते म्हणाले की, ''माझे विचार खूपच संकुचित आहेत व त्या पलीकडे काही असू शकते, हे आता माझ्या लक्षात आले. विवेकानंदाची मला आठवण झाली. ते एकदा म्हणाले होते, एखाद्या बेडकाला तो ज्या विहिरीत राहतो त्या पलीकडे महासागर असू शकतो हे त्याच्या लक्षात येत नाही. तसेच माझे झाले.''
दुसऱ्या दिवशी निरोप घेताना श्री धरमवीर यांनी स्वामी दयानंद सरस्वती लिखित 'सत्यार्थ प्रकाश' ची उर्दू आवृत्ती त्यांना भेट दिली. मौलवीसाहेबांनी बसमध्ये बसल्यानंतर पुस्तक चाळावयास सुरुवात केली आणि त्यांचे लक्ष चौदाव्या प्रकरणात कुराणातील केलेल्या लेखावर पडले. त्यामध्ये कुराणातील आयताविषयी चर्चा वाचून मौलवींना आश्चर्य वाटले व धक्काच बसला. पुस्तकावर एका संन्याशाचे चित्र, तर आत कुराणाविषयी तात्त्वि चर्चा!
स्वामी दयानंद सरस्वतींचे 'सत्यार्थ प्रकाश' हे पुस्तक भारतातील सर्व भाषांत प्रसिध्द झाले आहे. या ग्रंथात कुराणातील तत्त्वज्ञान व सनातन वैदिक धर्म याविषयी सखोल चर्चा आहे. आपल्या शास्त्राप्रमाणेच कुराणात (2.109) मध्ये म्हटले आहे की, तुम्ही कुठेही वळून बघा, परमेश्वर तेथे असतो. यावर स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, जर परमेश्वराचे अस्तित्व सर्व दिशांत असेल, तर मुसलमान लोक मक्केकडे तोंड करून नमाजपठण का करतात? त्यावर उत्तर देण्यात आले, आमची तशी शिकवण आहे व तशी आज्ञा आहे. स्वामीजी विचारतात, हा विरोधाभास नव्हे का? पुढे ते म्हणतात की, परमेश्वराचे अस्तित्व सर्व दिशातून असतांना कुठल्याही दिशेला तोंड करून नमाजपठण का नाही करत?
14 व्या प्रकरणात जवळजवळ 30,000 शब्दांत स्वामीजींनी कुराणासंबंधी विवेचन केले आहे. दिशाभूल करणारे कुराणातील विचार, अतिशयोक्ती व न पटणारे तत्त्वज्ञान यांचे विश्लेषण आहे. या चर्चेचा मौलवींवर खूप प्रभाव पडला. मौलवींनी आपल्या मनातील शंका 25 प्रमुख मुफ्तींकडे लेखी पाठवल्या व त्याचे उत्तर पाठवण्याची विनंती केली. कुराणातील विचार जर योग्य असतील, तर त्यांचे उत्तर आलेच पाहिजे. कुठलेही गैरसमज न करून घेता त्यांना उत्तर पाठविण्याची विनंती केली. फक्त सात जणांनी उत्तरे पाठविली व त्यात म्हटले, की तुमच्या शंकाकुशंकांना उत्तर देण्याची तुमची योग्यता नाही. असल्या शंकाकुशंका विचारून तुम्ही पवित्र कुराणाला आव्हान दिले आहे व त्यामुळे तुम्ही पाखंडी आहात.
कुणाकडूनही उत्तर न आल्यामुळे मौलवीसाहेब निराश झाले व विचारमंथन करून त्यांनी मुस्लीम धर्म सोडण्याचा विचार केला व वैदिक धर्म स्वीकारण्याचे निश्चित केले. नोव्हेंबर 30, 1983 रोजी त्यांनी शुध्दिकरण करून हिंदू धर्मात प्रवेश केला. शुध्दिकरणानंतर झालेल्या सभेत हजारो हिंदू-मुस्लीमांनी भाग घेतला होता. त्यांच्यासमोर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, मी फक्त एका समाजाला सोडून दुसऱ्या समाजात प्रवेश केला आहे. अशिक्षित, अतार्किक, अशास्त्रीय अशा मुस्लीम उम्मांना (ummahZm) सत्य विचारात घेण्याची आवश्यकता वाटत नाही. अंधारातून मी वैदिक धर्माने दाखवलेल्या प्रवेशात येत आहे. या धर्मात सत्याला मान आहे, शंकाकुशंकांना जागा आहे. विचारांची देवाण-घेवाण होऊ शकते. मी माझे उरलेले आयुष्य अशा समाजात घालवण्याचे निश्चित केले आहे. मौलवी महबूब अलींनी 'पंडित महेंद्रपाल आर्य' हे नाव स्वीकारले.
सरकारी साधू म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या स्वामी अगि्वेश ह्यांच्याशी भेट झाली असता अगि्वेशांनी त्यांना ''नवीन नाव का स्वीकारता? पूर्वीचेच नाव का नाही?'' असे विचारले. ''तुम्ही अगि्वेश यांच्याशी संबंध ठेवू नका, कारण त्यांचे खाजगी आयुष्य फार वादग्रस्त आहे'' असे अमर स्वामींनी सांगितले. पुढे असेही सांगितले, की स्वामी अगि्वेश ह्यांनी जंतरमंतर येथील जनतादलाच्या ऑफिसच्या काही भागाचा बेकायदेशीर ताबा घेतला आहे. तसेच, अगि्वेश भगवे वस्त्र घालून वावरत असले तरी हिंदू धर्मावर आग पाखडणाऱ्यांबरोबर त्यांची ऊठबस असते व ते मुल्ला आणि मौलाना यांच्याच सतत सहवासात जास्त वेळ घालवून हिंदू धर्माची निंदा करण्यात वेळ घालवतात.
गेली 29 वर्षे पं. महेंद्रपाल आर्य यांनी शेकडो सुशिक्षित लोकांना आपलेसे केले आहे. आतापर्यंत त्यांनी 15000 पेक्षा जास्त मुसलमानांना हिंदू धर्मात प्रवेश मिळवून दिला. पं. आर्य नेहमीच म्हणतात, ''मला महर्षी दयानंद सरस्वतींचे आशीर्वाद आहेत.''
पं. महेंद्रपाल यांनी 2004 मध्ये वहाबी धर्मगुरू झकीर नाईक  यांना चर्चेचे आव्हान दिले होते. विविध धर्माविषयी झकीर यांचा अभ्यास असून मुंबईतील डोंगरी भागात त्यांचे सुसज्ज कार्यालय आहे. पण हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत. पं. महेंद्रपाल आर्य म्हणतात, ''दुर्दैवाने हिंदू समाज अशिक्षित, विसकळीत असल्यामुळे इतर धर्मीयांचे फावते. यापुढे हिंदूंनी जागरूक असणे आवश्यक आहे.''
पं. आर्य पुढे म्हणतात, ''नरेंद्र मोदींनी एका समारंभात मुसलमानी टोपी घालण्याचे नाकारले, म्हणून त्यांच्यावर खूप टीका झाली. त्यामुळे तेथील मौलाना संतापले. पण त्याचवेळी कोणी गळयात रुद्राक्ष माळ घाला म्हणून त्या मौलानांना सांगितले असते, तर त्यांनी तसे केले असते का?''
28728226
साभार - साप्ताहिक विवेक  

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी