Friday, February 22, 2013

सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे


साभार - तरुण भारत 

तारीख: 2/16/2013 11:36:44 AM

$img_titleमित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील आपल्यासाठी पिटीचा एक वेगळा तास असतो. आपले पालकहीआपल्याला शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानीखेळ खेळण्यास प्रोत्साहित करीत असतात.मात्र, रोजची शाळा, शिकवणी वर्ग, हॉबी क्लासेस यामध्ये आपला बराचसा वेळ चालला जातो. त्यामुळे रोज घरी व्यायाम करायला कंटाळा येतो. तसेच रोजच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपण व्यायाम देखील करू शकत नाही.

 पण, मित्रांनो, असा एक व्यायाम आहे ज्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राहू शकते. बहुतेक तुमच्या आजोबांकडून किंवा बाबांकडून तुम्ही या व्यायाम प्रकाराचे नाव ऐकले देखील असेल. हा व्यायाम प्रकार म्हणजे योगासन आणि कवायत यांचा सुंदर मिलाफ साधणारा उत्तम व्यायाम प्रकार आहे.काय म्हणता तुमच्या लक्षात नाव आले आहे... यस, यस, अगदी बरोबर... सूर्यनमस्कार... चला तर मग जाणून घेऊयात सूर्यनमस्काराचे महत्त्व,त्याचे फायदे आणि तो घालण्याची पद्धत.
 रोज प्रात:समयी कोवळया किरणांत पूर्वेला तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत.
 आपल्या पूर्वजांनी पुढील शब्दांत सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
 आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने
 | जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्‌यं नोपजायते ॥
 अर्थ : जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मांत दारिद्र्य येत नाही.
 सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे
 अ. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.
 आ. हृदय व फुप्फुसांंची कार्यक्षमता वाढते.
 इ. बाहू व कंबरेचे स्नायू बळकट होतात.
 ई. पाठीचा मणका व कंबर लवचिक होते.
 उ. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.
 ऊ. पचनक्रिया सुधारते.
 ए. मनाची एकाग्रता वाढते.
 सूर्यनमस्कार घालताना करावयाच्या श्‍वसनक्रियांचे अर्थ
 १. पूरक म्हणजे दीर्घ श्‍वास आत घेणे.
 २. रेचक म्हणजे दीर्घ श्‍वास बाहेर सोडणे.
 ३. कुंभक म्हणजे श्‍वास रोखून धरणे.
 ४. आंतर्कुंभक म्हणजे श्‍वास आत घेऊन रोखणे
 ५. बहिर्कुंभक म्हणजे श्‍वास बाहेर सोडून रोखणे.
 सूर्यनमस्कार घालताना करावयाचे
 विविध नामजप
 १. ॐ मित्राय नम:
|२. ॐ रवये नम:
|३. ॐ सूर्याय नम:
|४. ॐ भानवे नम:
|५. ॐ खगाय नम:
|६. ॐ पूष्णे नम:
|७. ॐ हिरण्यगर्भाय नम:
|८. ॐ मरिचये नम:
|९. ॐ आदित्याय नम:
|१०. ॐ सवित्रे नम:
|११. ॐ अर्काय नम:
|१२. ॐ भास्कराय नम:
|१३. ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम:
|.........................

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी